मुंबई : नोकरीच्या नावाने फसवणूक झालेल्या एका तरुणाने मानसिक नैराश्यातून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिसांनी अनिल सत्यवान शिंदे या ३१ वर्षांच्या तरुणाविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मरिनड्राईन्ह पोलीस ठाण्यासमोरच एक महिला आणि एक पुरुष कुठल्या तरी विषयावर वाद घालत होते.
हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित पोलिसांनी दोघांकडे विचारणा केली. याच दरम्यान या पुरुषाने त्याच्याकडील बॉटलमधून पिवळ्या रंगाचे द्रव्य स्वत:च्या अंगावर ओतले. यावेळी पोलीस पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.