तरुणाची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या

मानसिक व शारीरिक शोषण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा या चौघांवर आरोप आहे.
तरुणाची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या

मुंबई : कौटुंबिक कारणावरून एका २५ वर्षांच्या तरुणाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काळाचौकी परिसरात उघडकीस आली आहे. राहुल विश्राम परमार असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नीसह तीन नातेवाईक अशा चौघांविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पूनम राहुल परमार, दिपक गोबर बगडा, पंकज प्रेमजी कंटारिया आणि किशोर परमार अशी या चौघांची नावे आहेत. विवाहबाह्य संबंधाची माहिती लपवून फसवणूक करून खोटी तक्रार करून पतीला सतत अटकेची धमकी देऊन मानसिक व शारीरिक शोषण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा या चौघांवर आरोप आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in