१४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती
१४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

मुंबई : घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २१ वर्षांच्या आरोपीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. रेहान तौफिक अली असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार मुलीची आई जोगेश्‍वरीतील बेहरामबाग परिसरात राहत असून याच परिसरात राहणारा रेहान त्यांच्या परिचयाचा आहे. बुधवारी १६ ऑगस्टला पिडीत मुलगी घरात एकटीच असल्याचा फायदा घेऊन रेहान आतमध्ये आला आणि या मुलीशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. घडलेला प्रकार तिने आईला सांगितल्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रेहानविरुद्ध ३५४, ३५४ ब, ४५२ भादवीसह ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रेहानला जोगेश्‍वरी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

logo
marathi.freepressjournal.in