पोलिसांना खबर देतो म्हणून तरुणावर हल्ला, जोगेश्वरीतील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नशा करणाची पोलिसांना खबर देतो म्हणून एकाच कुटुंबातील तिघांनी एका २५ वर्षांच्या तरुणावर हल्ला केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली.
पोलिसांना खबर देतो म्हणून तरुणावर हल्ला, जोगेश्वरीतील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : नशा करणाची पोलिसांना खबर देतो म्हणून एकाच कुटुंबातील तिघांनी एका २५ वर्षांच्या तरुणावर हल्ला केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या राहुल राजू शिंदे याच्यावर स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अक्रम दस्तगीर बाबासाहब शेख, अल्ताफ दस्तगीर बाबासाहब शेख आणि सोहेल दस्तगीर बाबासाहब शेख या तिघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला .

आहे राहुल हा जोगेश्वरीतील अग्रवाल इस्टेट, शास्त्रीनगरच्या अब्दुल बडोची चाळीत त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. तो एका खासगी कंपनीत ऑफिस बॉय तर त्याचे वडिल चालक म्हणून काम करतात. त्यांच्याच बाजूच्या एसआरए इमारतीमध्ये शेख कुटुंबीय राहत असून, ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांना नशा करण्याचे व्यसन होते. १ जुलैला रात्री दहा वाजता अक्रम आणि अल्ताफ हे दोघेही तिथे नशा करत होते. यावेळी तिथे पोलीस आले. पोलिसांना ही माहिती राहुल यानेच दिल्याचा त्यांना संशय होता. त्यामुळे त्यांना त्याच्यावर राग होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी राहुलला ओमसाई सहकारी सोसायटीच्या गार्डनसमोर बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर अक्रम, अल्ताफ आणि सोहेल यांनी त्याला शिवीगाळ बेदम लाथ्याबुक्क्यांनी करून मारहाण केली होती. या जखमी मारहाणीत तो गंभीररीत्या झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उपचार होते. तिथेच त्याच्यावर सुरू आहेत. ही माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राहुलची पोलिसांनी जबानी नोंदवून घेऊन घेतली असून, त्याच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in