ताडी पिण्याच्या वादातून तरुणाची हत्या

जखमी झालेल्या खुर्शीदला पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले
ताडी पिण्याच्या वादातून तरुणाची हत्या

मुंबई : साकिनाका येथे खुर्शीद सल्लाउद्दीन शेख या ३६ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपीने काचेच्या बाटलीने डोक्यात आणि पोटात वार करून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी शेरअली छोटूअली अहमद शेख असे याला साकिनाका पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पेालीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाह आलम शेख हा साकिनाका येथे राहत असून, गुरुवारी दुपारी तो काजूपाडा पाईपलाईनजवळील ज्योती ताडीमाडी सेंटरजवळ होता. यावेळी त्याचे शेरअलीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात शेरअलीने खुर्शीदवर ताडीच्या काचेच्या बाटलीने वार केले होते. त्यात त्याच्या पोटाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या खुर्शीदला पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शाह आलम शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शेरअली शेखविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या शेरअलीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in