मोबाईल चोरल्यावरून तरुणाची वार करून हत्या ;दोन्ही मारेकऱ्यांना अटक

तपासात ही माहिती उघड होताच या दोघांनाही हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : मानखुर्द येथे जाफर मोहम्मद फारुख अन्सारी या २८ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित दोन मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही मारेकऱ्यांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. आदिल अन्वर शेख आणि इरफान अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. मोबाईल चोरी केल्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

जाफरचा आदिलसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. याच वादातून त्याने जाफरवर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. जखमी अवस्थेत जाफरने आदिलचे नाव घेतले होते. त्यामुळे मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून काही तासांत आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत इरफानचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत मोबाईल चोरीवरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादानंतर या दोघांनी त्याची हत्या केली होती. तपासात ही माहिती उघड होताच या दोघांनाही हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in