स्टोन आर्टद्वारे तरुणाचे महात्मा गांधींना अभिवादन

महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सर्वांना सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला
स्टोन आर्टद्वारे तरुणाचे महात्मा गांधींना अभिवादन

भारतासह जगभरात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे मोठे योगदान राहिले आहे. गांधीजींचे विचार आणि अहिंसा आजही समाजासाठी उपयुक्त आहे. याच भावनेने त्यांना अभिवादन करण्यासाठी तरुण चित्रकार सुमन दाभोळकर यांनी स्टोन आर्ट साकारले आहे. स्वतःच्या वेगळ्या शैलीतून नदीतल्या दगडाचा वापर करत नैसर्गिक आकाराला कोणत्याही प्रकारचा छेद न देता त्या आकारातून महात्मा गांधी यांचे स्टोन आर्ट दाभोळकर यांनी साकारले आहे.

महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सर्वांना सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला. गांधींनी देशाच्या तरुणांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला, जेम्स लॉसन इत्यादी जगभरातील मोठे नेते उदयास आले. आज गेल्या १५० वर्षांहून अधिक काळ गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कित्येक पिढ्यांवर कायम आहे. याच प्रेरणेतून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यासाठी चित्रकार सुमन दाभोळकर यांनी गावाकडील नदीवर जाऊन एक साजेसा दगड शोधला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in