अचानक उजव्या बाजूला डंपर नेण्याचा प्रयत्न; बाईक स्लीप झाली, भाऊ-बहिण पडले; डंपरने तरुणीला चिरडले

डंपरच्या चाकाखाली आल्याने प्राची शर्मा या २१ वर्षांच्या कॉलेज तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दहिसर परिसरात घडली.
अचानक उजव्या बाजूला डंपर नेण्याचा प्रयत्न; बाईक स्लीप झाली, भाऊ-बहिण पडले; डंपरने तरुणीला चिरडले
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : डंपरच्या चाकाखाली आल्याने प्राची शर्मा या २१ वर्षांच्या कॉलेज तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दहिसर परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी डंपरचालक सरजू सामू राजभर (४५) याच्याविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला नंतर अटक केली. हा अपघात गुरुवारी, १५ फेब्रुवारीला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर झाला.

क्षितीज हा १९ वर्षांचा तरुण मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीजवळील युफोरिया इमारतीमध्ये राहतो. मृत प्राची ही त्याची मोठी बहिण असून, ते दोघेही बोरिवलीतील सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेजमध्ये शिकतात. गुरुवारी ते दोघेही नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी क्षितीज हा बाइक चालवत होता, तर प्राची त्याच्या मागे बसली होती. ही बाईक दहिसर चेकनाका येथे येताच एका डंपरचालकाने अचानक उजव्या बाजूला डंपर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने बाइकला ब्रेक लावला होता. यावेळी त्यांची बाइक स्लिप होऊन ते दोघेही खाली पडले. याच दरम्यान डंपरच्या चाकाखाली आल्याने प्राची ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्या अवस्थेत तिला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in