चोर समजून जमावाने मारल्याने तरुणाचा मृत्यू

कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मारहाण करणार्‍या तीन ते चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले
चोर समजून जमावाने मारल्याने तरुणाचा मृत्यू

चोर समजून संतप्त जमावाकडून झालेल्या मारहाणीत प्रविण लहाने या २६ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री बोरिवली परिसरात घडली. प्रविण हा एका पोलीस अधिकार्‍याचा लहान भाऊ असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मारहाण करणार्‍या तीन ते चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

प्रविणचा भाऊ मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असून सध्या तो सांताक्रूझ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो बोरिवलीतील गोराई परिसरात राहतो. बुधवारी रात्री प्रविण हा नाशिक येथून बोरिवली येथे आला होता. त्याने मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत तो बोरिवलतीील कार्टर रोड क्रमांक चारजवळील एका सोसायटीजवळ फिरत होता. तो चोर समजून त्याला एका जमावाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो बेशुद्ध झाला होता. ही माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी तरुणाला पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in