मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर आधार काउंटर

रेल्वे स्थानकांवर देखील प्रवाशांना नवीन आधार नोंदणी तसेच आधार अपडेट सुविधा मध्य रेल्वेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर आधार काउंटर

मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आधार काउंटर सुरू करण्यात येणार आहेत. भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या समन्वयाने ही सुविधा सुरु करण्यात येणार असून प्रशिक्षित रेल्वे कर्मचारी हे आधार अपडेट काउंटर चालवणार आहेत.

नागरिकांसाठी आवश्यक असलेले आधार कार्ड निंदणी अथवा जुन्या आधार कार्डला अपडेट करण्यासाठी विविध केंद्रे शासनामार्फत ठिकठिकाणी सुरु आहेत. आता रेल्वे स्थानकांवर देखील प्रवाशांना नवीन आधार नोंदणी तसेच आधार अपडेट (मुलांसाठी बायोमॅट्रिक इ.) सुविधा मध्य रेल्वेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये इतर पर्यायी अपडेट जसे की मोबाइल नंबर अपडेट, पत्ता बदलण्यासाठी ५०/- रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. प्राथमिक स्वरूपात पुणे रेल्वे स्थानकावर ही सुविधा सुरू करण्यात आली असून येत्या काही दिवसात सीएसएमटी, नागपूर सारख्या इतर प्रमुख स्थानकांवर हळूहळू सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in