आरे मेट्रो कारशेडविरोधात आम आदमी पार्टीची उडी

हनुमान चालीसेचे पठण करून थेट हनुमानालाच ‘आरे वाचवा आणि मुंबई वाचवा’ यासाठी साद घातली जाणार आहे
आरे मेट्रो कारशेडविरोधात आम आदमी पार्टीची उडी

नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आरे जंगलात मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अनेक पर्यावरणविषयक संस्था तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला असून रविवार ३ जुलै रोजी आरे येथे सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.आम आदमी पार्टीने (आप) या प्रकरणात उडी घेतली असून त्यांचे जवळपास एक हजार कार्यकर्ते रविवारी १० वाजता निदर्शने करणार आहेत.

विशेष म्हणजे हनुमान चालीसेचे पठण करून थेट हनुमानालाच ‘आरे वाचवा आणि मुंबई वाचवा’ यासाठी साद घातली जाणार आहे. ‘आप’ने या मोहिमेत मुंबईकरांनीही सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे, असे ‘आप’च्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा-मेनन यांनी सांगितले. २०१४ ते २०१९ या कालावधीत भाजप-शिवसेना सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरे येथे मेट्रो-३चे कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी अनेक संस्था, जागरूक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता.

‘आप’टच्या प्रीती शर्मा म्हणाल्या की, “आम्ही त्यांना आरेची एक इंच जागाही घेऊ देणार नाही. आम्हाला मेट्रो हवी आहे, पण त्याची कारशेड कांजूरमार्ग येथेच बांधील जावी. जर आपण आरे जंगल वाचवू शकलो तरच मुंबई वाचवता येईल.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in