प्रेमसंबंधातून मैत्रिणीच्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण

निदर्शनास येताच तिने नागपाडा पोलीस ठाणत तक्रार केली
प्रेमसंबंधातून मैत्रिणीच्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण

मुंबई : पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश करण्यात नागपाडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रोतीन घोष या आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली, तर त्याच्या तावडीतून या मुलीची सुटका करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आला आहे. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी ही माहिती दिली. २८ वर्षांची तक्रारदार महिला ही नागपाडा येथील कामाठीपुरा परिसरात राहत असून, तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे. तिचा रोतीश हा मित्र असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात प्रेमसंबंधातून वाद निर्माण झाले होते. त्यातून ५ सप्टेंबरला त्याने तिच्या घरातून तिच्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केले होते. हा प्रकार या महिलेच्या निदर्शनास येताच तिने नागपाडा पोलीस ठाणत रोतीनविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकाने रोतीनचा शोध सुरू केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in