अखेर अश्विनी भिडे, पी. वेलरासू यांची बदली; अभिजीत बांगर मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, अश्विनी भिडे यांची बदली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर भिडे यांच्याजागी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी यांची नेमणूक झाली आहे.
अखेर अश्विनी भिडे, पी. वेलरासू यांची बदली; अभिजीत बांगर मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशांतर राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, अश्विनी भिडे यांची बदली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर भिडे यांच्याजागी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी यांची नेमणूक झाली आहे. मुंबई महापालिकेचे आणखी एक अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची नेमणूक करण्यात आली आहे. वेलारासू यांची बदली करताना त्यांना नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संजय मीना यांची नेमणूक झाली आहे. सनदी अधिकारी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, शुभम गुप्ता यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर विशाल नरवडे यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

चहल यांच्याबाबत सस्पेन्स कायम

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीबाबत रात्री उशिरापर्यंत सस्पेन्स कायम होता. राज्य सरकार चहल यांना आयुक्तपदी ठेवण्याबाबत आग्रही असून निवडणूक आयोग त्यांच्या बदलीवर ठाम असल्याने राज्य सरकार काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in