अभिषेक घोसाळकर पंचत्वात विलीन; पत्नी आणि मुलीसह पित्यानेही फोडला टाहो

पार्थिवाला त्यांच्या धाकट्या भावाने अग्नी दिला अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले
अभिषेक घोसाळकर पंचत्वात विलीन; पत्नी आणि मुलीसह पित्यानेही फोडला टाहो

मुंबई : दहिसरचे शिवसेना उबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर शुक्रवारी पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या धाकट्या भावाने अग्नी दिला. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक यांचे पार्थिव पाहताच त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला.

शिवसेना पक्ष प्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन घोसाळकर कुटुंबाचे सांत्वन केले. ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणले तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर आणि त्यांची पत्नी, मुलगी यांना सगळ्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी टाहो फोडला होता. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घोसाळकर यांचे पार्थिव आज बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवले होते. ज्यावेळी अभिषेक यांचे पार्थिव घराच्या खाली आणले तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला. तर अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि मुलगी या दोघींच्या डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in