मुंबईतील टोल बंद करा

शिवसेना नेते (उबाठा) आदित्य ठाकरेंची मागणी
मुंबईतील टोल बंद करा

मुंबई : राज्य सरकारने एमएसआरडीसी अंतर्गत असणारे पश्चिम आणि पूर्व द्रूतगती महामार्गावरचे रस्ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. मुंबई महापालिका या रस्त्यांची विशेष काळजी तसेच डागडुजी करत असताना या रस्त्यांवरची टोल वसुली एमएसआरडीसी का करत आहे. दोन टोल नाक्यांवरील वसुली त्वरित बंद करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. आमचे सरकार आल्यावर टोल वसुली बंद करणार, असे आश्वासनही आदित्य ठाकरेंनी दिले.

राज्य सरकारने टोल नाका आणि इतर जाहिरातींच्या होर्डिंगचे पैसेही मग मुंबई महानगरपालिकेला द्यावेत. ही सगळी वसुली राज्य सरकार एमएसआरडीसीकडे कंत्राटदारांच्या हितासाठी करत आहे का? असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

सर्वात जास्त कर मुंबईकर देतात. मुंबई-गोवा महामार्ग आणि इतर रस्ते हे चंद्रावरील खड्ड्यांसारखे झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री का लक्ष देत नाहीत. जर मनपा सगळं करत आहे, तर टोल नाका रद्द करावा. एमएसआरडीसीचे मुंबईच्या रस्त्यांवर काही काडीमात्र काम नाही. मग होर्डिंगचे पैसे आणि टोलचे पैसे हे मनपाला द्यायला हवेत. हे सर्व पैसे राज्य सरकार आणि एमएसआरडीसीच्या खिशात जात आहेत.

ही टोल वसुली बंद करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही. कारण आंदोलन केल्यास टोलवर काम करणाऱ्यांना त्रास होईल. मी मुंबई महापालिकेला पत्र दिले आहे, पण हे सरकार वसुली सरकार आहे. कंत्राटदाराच सरकार आहे. आमचे सरकार आले की आम्ही टोल बंद करू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

पाच टोलनाके बंद करा -मनसे

मुंबईतील फक्त दोनच नाही, तर पाचही एण्ट्री पॉइंटवरील टोल माफ करावे, अशी मागणी मनसेचे प्रवक्ते संजय शिरोडकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in