गणेशोत्सवात सुमारे ८० हजार पर्यंटकांनी राणीबागची सफर केली

अत्याधुनिक पिंजरे आणि पेंग्विनला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक गर्दी करत आहेत.
गणेशोत्सवात सुमारे ८० हजार पर्यंटकांनी राणीबागची सफर केली

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणी बाग) राज्यभरातून राणीबाग पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची गर्दी असते; मात्र संपूर्ण गणेशोत्सवात तब्बल ८१ हजार ७५२ पर्यंटकांनी राणीबागची सफर केली. त्यामुळे राणीबागच्या महसुलातदेखील वाढ झाली.

राणीबागेतील प्राणी-पक्षी त्यांचे अत्याधुनिक पिंजरे आणि पेंग्विनला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक गर्दी करत आहेत. त्यातच वीकेण्ड आणि सुट्ट्यांमध्ये राणीबाग पर्यटकांनी गजबजते. गणेशोत्सव काळात तर ८१ हजार ७५२ पर्यटकांनी राणीबागेची सफर केली. प्रशासनाला ही गर्दी आटोक्यात आणताना नाकी नऊ येत आहेत.

राणीबागेत सध्या पेंग्विनसोबत, बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या, वाघ पर्यटकांना पाहण्यासाठीदेखील पिंजऱ्यातही ठेवण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in