चोरीच्या गुन्ह्यांत पळून गेलेल्या नोकराला अटक

दागिने बनविण्यासाठी दिल्यांनतर त्याने ७० ग्रॅम वजनाचे दागिने चोरी करून पलायन केले होते.
चोरीच्या गुन्ह्यांत पळून गेलेल्या नोकराला अटक

मुंबई : साडेतीन लाखांच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी पळून गेलेल्या सुरोजित गोपाळ माझी या नोकराला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. दागिने बनविण्यासाठी दिल्यांनतर त्याने ७० ग्रॅम वजनाचे दागिने चोरी करून पलायन केले होते. सभापती महानंद मिश्रा हे यांचा गोरेगाव येथे मास क्रिएशन नावाचे गोल्ड आणि हिऱ्यांचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे पंधरा कारागिर कामाला असून त्यात सुरोजीत हा गेल्या सहा महिन्यांपासून दागिने फायलिंग कारागीर म्हणून कामाला होता. २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२३ या कालावधीत त्याला सभापती यांनी विविध सोन्याचे दागिने फिनिशिंगसाठी दिले होते. यावेळी त्याने साडेतीन लाखांचे सत्तर ग्रॅम सोन्याची चोरी केली होती. ६ डिसेंबरला तो कामावर आला नाही. त्याच्या विरार येथील घरी गेल्यानंतर तो त्याच्या गावी निघून गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सुरोजीतने बनविलेल्या दागिन्यांची पाहणी केल्यानंतर त्यात साडेतीन लाखांचे सत्तर ग्रॅम वजनाचे दागिने कमी असल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दिडोंशी पोलिसांत सुरोजित माझीविरुद्घ तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या सुरोजितला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून लवकरच दागिने जप्त केले जातील असे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in