एसी लोकलला प्रवाशांची पसंती ८ महिन्यांत सवा कोटी प्रवाशांचा गारेगार प्रवास ;६०.२३ कोटींचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीत

वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ६०.२३ कोटी रुपये जमा झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एसी लोकलला प्रवाशांची पसंती ८ महिन्यांत सवा कोटी प्रवाशांचा गारेगार प्रवास ;६०.२३ कोटींचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीत

मुंबई : आरामदायी व गारेगार प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सेवेत वातानुकूलित लोकल सेवा सुरू केली. प्रवाशांनी ही एसी लोकलला पसंती दिली असून एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांत तब्बल १.३१ लाख प्रवाशांनी गारेगार प्रवास केला. तर वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ६०.२३ कोटी रुपये जमा झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात ५० लाखांहून अधिक प्रवासी मध्य व हार्बर मार्गावर प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल आणल्या.

मध्य रेल्वे उपनगरीय विभागात पाच रेकसह ६६ वातानुकूलित लोकल चालवण्यात येतात. सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करण्यासह वातानुकूलित लोकलचे प्रवासी तिकीट दर वर्षभरापूर्वी कमी केल्यानंतर प्रवासी एसी लोकलने प्रवासास पसंती देत आहेत. एप्रिल-नोव्हेंबर २०२३ दरम्यान प्रति रेक सरासरी प्रवासी संख्या १,१०५ पर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ७२७ होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरीय वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

प्रवासी संख्येत वाढ

महिना - प्रवासी

एप्रिल - १५,२,८३९

मे - १७,३४,९५९

जून - १६,९८,३१९

जुलै - १५,४०,५१७

ऑगस्ट - १६,६०,०५८

सप्टेंबर - १५,५९,३२६

ऑक्टोबर - १७,९३,४९९

एकूण - १३१,८४,३१९

logo
marathi.freepressjournal.in