प. रेल्वेवर आणखी एसी लोकल धावणार

नवीन एसी लोकलचे रेक आल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगल्या प्रकारे प्रवासाचा आनंद घेता येऊ शकेल.
प. रेल्वेवर आणखी एसी लोकल धावणार

कमल मिश्रा/मुंबई : वातानुकूलित लोकल (एसी) मुंबईकरांच्या पसंतीस पडू लागली आहे. त्यामुळे लवकरच प. रेल्वेच्या ताफ्यात आणखी ५० एसी लोकल येणार आहेत.

सध्या प. रेल्वेवर ९६ एसी लोकल धावतात. प. रेल्वेकडे एसी लोकलच्या सात रेक्स आहेत. मार्च २०२४ पर्यंत आणखी पाच एसी लोकल येतील.

प. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा म्हणाले की, आम्हाला मार्चपर्यंत आणखी ५ एसी लोकल मिळतील. त्यानंतर आम्ही एसी लोकलची सेवा आणखीन वाढवू.

आरामदायी व जलद प्रवास होत असल्याने प्रवासी एसी लोकलना प्राधान्य देत आहेत. शहरातील तापमान गरम असून घामही पुष्कळ येतो. त्यामुळे प्रवाशांना चांगला प्रवास घडण्यासाठी एसी लोकल उपयुक्त ठरतात.

नवीन एसी लोकलचे रेक आल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगल्या प्रकारे प्रवासाचा आनंद घेता येऊ शकेल. प. रेल्वेकडून सर्व स्थानकांची लांबी वाढवली जाणार आहे. १५ डब्यांच्या लोकल तेथे थांबतील, अशी व्यवस्था केली जाईल. सध्या चर्चगेट ते अंधेरी रेल्वे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल थांबतात. अंधेरीपुढील सर्वच फलाटांची लांबी वाढवली जाईल. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास आरामदायी पद्धतीने करायला मिळेल. धीम्या गती मार्गावरील सर्वच फलाटांचा विस्तार करणार आहोत. १२ डब्यांच्या जास्तीत जास्त लोकल १५ डब्यांच्या करण्यावर आमचा भर असेल. सध्या प. रेल्वेवर १३९४ लोकल सेवा चालवल्या जातात. त्यातील १९९ फेऱ्या या १५ डब्यांच्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in