एलटीटी स्थानकात एसी विश्रांतीगृह; परळ, भांडुप, नाहूर व कळवा स्थानकात एटीएमची सुविधा

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे वातानुकूलित विश्रांती गृह, परळ, भांडुप नाहूर व कळवा स्थानकात एटीएमची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
एलटीटी स्थानकात एसी विश्रांतीगृह; परळ, भांडुप, नाहूर व कळवा स्थानकात एटीएमची सुविधा

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे वातानुकूलित विश्रांती गृह, परळ, भांडुप नाहूर व कळवा स्थानकात एटीएमची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने मंगळवारी लिलाव प्रक्रिया पार पडल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर वातानुकूलित शयनकक्ष आणि विश्रांती गृह विकास, सुविधा, परिचालन आणि व्यवस्थापन "बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा" या आधारावर ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे परवानाधारक व्यक्ती ग्राहकांना खानपान सेवा पुरवू शकणार आहे. ही सुविधा फक्त अधिकृत रेल्वे प्रवासाच्या प्रवाशांना आणि त्यांना सामान ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कंत्राटाचे एकूण मूल्य ३.१८ करोड रुपये असून वार्षिक परवाना शुल्क ६३,६३,९८७/- रुपये असणार आहे. तसेच पुढील पाच वर्षांसाठी अर्थात २५ मे २०२४ ते २८ मे २०२९ पर्यंत कंत्राट देण्यात येणार आहे.

मुंबई विभागातील उपनगरीय स्थानकांवर एटीएमची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका / शेड्यूल्ड आणि कमर्शियल बॅंका, सहकारी बॅंका आदि द्वारा एटीएम स्थापन करण्याची अनुमती कराराच्या आधारे देण्यात आली आहे.

मुंबई विभागात परळ, भांडुप, नाहूर आणि कळवा स्थानकांवर ५ वर्षांच्या कालावधीत एटीएम बसवण्याच्या जागा वाटपाची बोली लावण्यासाठी इच्छुक पक्षांना आमंत्रित करण्यात येत आहे. एटीएम ३६ स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे असेल. या कंत्राटाची एकूण किंमत २.०७ कोटी रुपये असून याचे एकूण वार्षिक उत्पन्न ४१.४५ लाख रुपये असणार आहे.

येथे नोंदणी करणे बंधनकारक!

ई-लिलाव पद्धत ही वाणिज्यिक क्षेत्रांना एकत्रित करण्याची एक नवी ऑनलाइन प्रणाली आहे. या लिलाव ई - माध्यमातून पूर्णपणे ऑनलाइन आयोजित केला जात आहे. ई-लिलाव पद्धतीमध्ये बोली लावण्यासाठी आयआरईपीएस रेल्वे संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. वैध बोली लावणारे परिणाम आणि आवंटन पत्र (एलओए) लिलावाच्या दिवशीच ऑनलाइन पद्धतीने जाहीर होईल.

खाद्यपदार्थाच्या बॉक्सर जाहिरात!

ट्रेन क्रमांक २२२२९/२२२३० ई-लिलाव च्या माध्यमातून खाद्यपदार्थाच्या बॉक्सवरील मागील बाजूस जाहिरात करण्याचे कंत्राट २९ फेब्रुवारी २०२४ ते २७ फेब्रुवारी २०२७ असे ३ वर्षांपर्यंत देण्यात आले आहे. कंत्राटाची एकूण किंमत ३० लाख रुपये असून वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये इतके आहे.

logo
marathi.freepressjournal.in