टिळक पुलाच्या कामाला वेग; ऑक्टोबरपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

दक्षिण मुंबईतील दादर स्थानकातील १०० वर्षे जुना टिळक पूल वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण पूल आहे. या पुलामुळे लोअर परळ, प्रभादेवी, वरळी ते पूर्व द्रूतगती महामार्गापर्यंतच्या वाहतुकीला चांगली कनेक्टिव्हिटी प्राप्त होत आहे.
टिळक पुलाच्या कामाला वेग; ऑक्टोबरपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : दक्षिण मुंबईतील १०० वर्षे जुना दादर येथील टिळक पूल दिमाखात उभा राहणार आहे. वांद्रे सी-लिंकच्या धर्तीवर टिळक पूल केबल स्टेड आधारित होत असून, वाहतूक बंद न ठेवता पुलाचे काम वेगाने सुरू आहे. दादर स्थानकातील पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक पुलावर स्पॅन गर्डर लाँच करण्यात आला आहे. या पुलाची पुनर्बांधणी दोन टप्प्यात होत असून, पहिल्या टप्प्याचे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे काम वेळीच पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि चार सेल्फी पाॅइंट असणार आहेत, अशी माहिती महारेराकडून देण्यात आली.

दक्षिण मुंबईतील दादर स्थानकातील १०० वर्षे जुना टिळक पूल वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण पूल आहे. या पुलामुळे लोअर परळ, प्रभादेवी, वरळी ते पूर्व द्रूतगती महामार्गापर्यंतच्या वाहतुकीला चांगली कनेक्टिव्हिटी प्राप्त होत आहे. महारेलने येथील जिओ टेक्निकल काम, जागेवरील युटिलिटीज स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण केले असून, केबल स्टेड आधारित पुलाचे ब्रिजचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास महारेलकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य रेल्वे, पालिका यांच्यात समन्वय साधत पुलाचे काम वेगाने सुरू आहे. दोन टप्प्यात हा पुलाचे बांधकाम सुरू असून, पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाला लागून असलेल्या नवीन पुलाचे बांधकाम वाहतूक न थांबवता सुरू आहे.

त्यानंतर वाहतूक नव्या पुलाकडे वळवत जुना पूल पाडण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात केबल स्टेड पुलाच्या दुसऱ्या बाजूची पुनर्बांधणी पूर्ण करण्यात येणार आहे. केबल स्टेड पुलाच्या प्रत्येक भागाची एकूण लांबी ६६३ मीटर असून, प्रत्येक भागाची रुंदी १६.७ मीटर आहे.

‘असा’ होतोय पूल

  • पहिल्या टप्प्यात एकूण ७ फाऊंडेशन बांधणार

  • ७ पैकी ५ फाऊंडेशनचे काम पूर्ण

  • रेल्वे भागात पायलॉनसह उर्वरित २ फाऊंडेशनचे काम प्रगतिपथावर

  • पिअर कॅपपर्यंत दोन्ही बाजूच्या ॲप्रोच स्पॅन्सचे काम पूर्ण

  • ॲप्रोच स्पॅनसाठी सर्व स्टील गर्डर तयार; गर्डर टाकण्याचे काम सुरू

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in