'आमच्यासोबत या पक्षप्रमुखपद स्वीकारा'शिंदे गटाची उद्धव ठाकरेंना ऑफर

माजी मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून शुभेच्छा देताना तसा उल्लेख केला
'आमच्यासोबत या पक्षप्रमुखपद स्वीकारा'शिंदे गटाची उद्धव ठाकरेंना ऑफर

आम्ही शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली, त्यात आम्ही पक्षप्रमुख पदावर कुणाची नियुक्ती केली नाही. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि पक्षप्रमुखपद स्वीकारावे’, अशी ऑफर शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना दिली आहे. ‘आम्हाला या सर्व गोष्टींचा शेवट गोड व्हावा, असे वाटते आहे; मात्र शिवसेना पक्षप्रमुख पदापेक्षा राज्याचे मुख्यमंत्रिपद मोठे आहे’, असेही शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंपेक्षा पक्षात एकनाथ शिंदेंना बंडखोर आमदारांनी मोठे पद अन‌् मान दिल्याचे दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून शुभेच्छा देताना तसा उल्लेख केला. पक्षप्रमुख पद हे पक्षापुरते मर्यादित असते, तर मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी असते, असे म्हणत मुख्यमंत्रिपद हे शिवसेनाप्रमुख पदापेक्षा मोठे पद असल्याचा टोला केसरकरांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in