माजी पोलीस सहाय्यक आयुक्ताचा अपघाती मृत्यू

रशीद हे १९७४-७६च्या बॅचचे पोलीस अधिकारी असून मंगळवारी रात्री ते भाऊचा धक्का येथे फिरत असताना त्यांना टॅक्सीने धडक दिली.
माजी पोलीस सहाय्यक आयुक्ताचा अपघाती मृत्यू

मुंबई : माजी पोलीस सहाय्यक आयुक्त मोहम्मद जावेद अब्दुल रशीद (७२) यांचा शिवडी येथे मंगळवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. शिवडीच्या बीपीटी पार्किंगजवळील गणेश मंदिराच्या मागे असलेल्या मुजावर काकडे रोडवर त्यांना टॅक्सीने धडक दिली. पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरला अटक केली आहे. सुधीरकुमार केशवप्रसाद शर्मा (४०) असे टॅक्सीचालकाचे नाव आहे.

रशीद हे १९७४-७६च्या बॅचचे पोलीस अधिकारी असून मंगळवारी रात्री ते भाऊचा धक्का येथे फिरत असताना त्यांना टॅक्सीने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रशीद यांना जेजे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टॅक्सीचालकाविरोधात भादंविच्या कलम २७९, ३३८, ३०४ (अ) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे शिवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in