रेल्वे डब्यांवर 'ब्ल्यू अलर्ट' यंत्रणेमुळे दुर्घटनांना आळा बसणार

 रेल्वे डब्यांवर 'ब्ल्यू अलर्ट' यंत्रणेमुळे दुर्घटनांना आळा बसणार
Published on

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते; मात्र अनेक उपाययोजना करूनही बहुतांश वेळा रेल्वे दुर्घटना घडतात. या घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून रेल्वे पोलीससंख्या वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी उपाययोजना करण्यात आल्या; मात्र तरीदेखील वाढत्या गर्दीमुळे कधी लोकलमधून प्रवासी पडणे तर कधी रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना घडल्याचे सर्रास दिसून येते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने परीक्षणाच्या माध्यमातून लोकल डब्याच्या गेटवर एक ‘ब्ल्यू अलर्ट’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज अनेक दुर्घटना घडतात. यामध्ये सरासरी १० जणांना मृत्यूला सामोरे जावे लागते. फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मार्फत अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा दुर्घटना घडल्यास प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो. तर रेल्वे वाहतूकही खोळंबते. मात्र, प्रशासनाने रेल्वे डब्यांवर 'ब्ल्यू अलर्ट' यंत्रणा बसवण्याच्या निर्णयामुळे या घटनांमध्ये घट होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सुरक्षेत वाढ होणार आहे. दरम्यान, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर काही डब्यांच्या गेटवर हे अलर्ट लावण्यात येणार असून पुढील काही महिन्यांत प्रतिसाद पाहून सर्व ट्रेनमधील डब्यांना हे अलर्ट लावण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in