पॅरोलवरून फरार झालेल्या आरोपीस एक वर्षाने अटक

पॅरोलवरून फरार झालेल्या कन्हय्या एडशी सातडिया या आरोपीस एक वर्षांनी अटक करण्यात बोरिवली रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
पॅरोलवरून फरार झालेल्या आरोपीस एक वर्षाने अटक

मुंबई : पॅरोलवरून फरार झालेल्या कन्हय्या एडशी सातडिया या आरोपीस एक वर्षांनी अटक करण्यात बोरिवली रेल्वे पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाच्या आदेशावरुन पुन्हा जेलमध्ये पाठविण्यात आले आहे. कन्हय्या हा दहिसर रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टी राहतो. तो सराईत गुन्हेगार असून चार वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात एक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. गुन्हा दाखल होताच त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत आरोपपत्र सादर केल्यानंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला सहा महिने कारावास आणि पाचशे रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन आठ दिवस कारावास ठोठावण्यात आला होता. शिक्षा झाल्यानंतर त्याला नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र कोरोना काळात इतर कैद्याप्रमाणे त्याला पॅरोलवर सोडण्यात आले होते. यावेळी त्याला स्थानिक पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावण्यात सांगण्यात आले होते. मात्र पोलीस ठाण्यात हजेरी न लावता तो डिसेंबर २०२२ रोजी पळून गेला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in