तीन वर्षांपासून फरार आरोपीस रायगड येथून अटक

अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी बोरिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन वर्षांपासून फरार आरोपीस रायगड येथून अटक

मुंबई : खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस तीन वर्षांनी रायगड येथून कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. प्रितेश प्रभाकर घाटवळ ऊर्फ पित्या असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध बोरिवली, कांदिवली पोलीस ठाण्यात काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी बोरिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रितेश हा मूळचा रायगड्यज्ञा अलीबाग, धोकवडेचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध कांदिवली आणि बोरिवली पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. तीन वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी खंडणीसह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र प्रितेश हा गुन्हा दाखल होताच पळून गेला होता. गेल्या तीन वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता.

logo
marathi.freepressjournal.in