बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक; अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई

गेले अनेक दिवस फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानीला अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले
बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक; अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची फसवणूक आणि ब्लॅकमेल प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेले काही दिवस फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. यापूर्वीच मुंबई पोलिसांनी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देऊ करणाऱ्या अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला अटक केली होती.

अमृता फडणवीस यांना अनिल जयसिंघानी आणि मुलगी अनिक्षा यांनी एका प्रकारांमध्ये मदत करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी लाच देऊ केले होते. यानंतर अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. विशेष म्हणजे, एक फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली होती. त्यानंतर अनिक्षाने वडिलांची फसवणूक झाल्याचे सांगत मदत करण्याची मागणी केली. याप्रकरणी १ कोटी रूपांची लाच देण्याचा प्रयत्न केला. २० फेब्रुवारीला याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी याप्रकरणी मलबार हिल पोलीस स्थानकात तक्रार केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in