
मुंबई : दोन वर्षांचा भाडेकरार करून १५ लाख रुपयांचे हेव्ही डिपॉझिट घेऊन फ्लॅट न देता फसवणूक करून पळून गेलेल्या भामट्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. हाशिम कासम मंडल असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात जील मारिया डिसूजा, करण लोढाया आणि सौरभ यांचा समावेश आहे. प्रल्हाद रुपसिंग कुमार फ्लॅटच्या शोधात असताना, जून महिन्यांत त्याची करण आणि सौरभशी ओळख झाली होती. या दोघांनी त्याला भाड्याने फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून त्यांची हाशिमसोबत ओळख करून दिली. हाशिमने मालाड येथील आपल्या मालकीचा फ्लॅट भाडेकरारावर दिला. १५ लाख रुपयांची कॅश दिल्यानंतर त्यांनी प्रल्हाद कुमार यांना ५ जुलैला फ्लॅटची चावी दिली. मात्र त्यांना पत्नी मारियाने फ्लॅट देण्यास नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली.