तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस अटक

मार्च महिन्यात त्याने पुन्हा विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे तिने विलेपार्ले पोलिसांत मंदारविरुद्ध तक्रार केली होती.
तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस अटक

मुंबई : विलेपार्ले आणि अंधेरीतील हॉटेलमध्ये एका तरुणीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मित्राला अंधेरी पोलिसांनी अटक केली. मंदार श्रीपाद नामजोशी असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून, तो विरारचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कळवा येथे राहणारी ही तरुणी विलेपार्ले येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिची दहा वर्षांपूर्वी मंदारसोबत ओळख झाली होती. ते दोघेही दादर येथील एका हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी तिथे आले होते. कोर्सदरम्यान ओळख झाल्यांनतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते; मात्र मंदार विवाहीत असल्याचे समजताच तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. तरीही तो तिला सतत मॅसेज करुन भेटण्यासाठी बोलवत होता. एप्रिल २०२२ रोजी ते दोघेही अंधेरी येथे भेटले होते. एका हॉटेलमध्ये नेल्यांनतर त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करून अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. यावेळी त्याने तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मार्च महिन्यात त्याने पुन्हा विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे तिने विलेपार्ले पोलिसांत मंदारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in