
मुंबई : कारचे पार्टस चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मोहसीन मेहबूब खान असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी विविध कारचे चोरीचे ६८ जून पेट्रोल ईसीएम आणि सीएनजी इन्जेक्टर जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जून महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात अंधेरी येथील काही कारचे पार्टस अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते. हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीस येताच या कारचालकांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने मालाड येथे राहणाऱ्या मोहसीन शेख या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे ३६ पेट्रोल ईसीएम आणि ३२ सीएनजी इनजेक्टर असा मुद्देमाल जप्त केला.