मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक

एका भाड्याची गरज होती. याच दरम्यान तिची शांताबाई बनसोडेशी ओळख झाली होती
मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक

मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी युनूस शेखला शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हेव्ही डिपॉझिटच्या नावाने ही फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सागितले.

अंधेरी येथे तक्रारदार महिला राहत असून ती मंत्रालयात कामाला आहे. तिला एका भाड्याची गरज होती. याच दरम्यान तिची शांताबाई बनसोडेशी ओळख झाली होती. तिने तिला शेख कुटुंबीयांचा मरोळ पाईपलाईन, बिलाल मशिदीजवळील एक रूम दाखविल होती. त्यांच्यात हेव्ही डिपॉझिटवर ही रूम घेण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे तिने शेख कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले होते. नंतर मुलीच्या लग्नासाठी त्यांनी तिच्याकडून आणखीन दोन लाख रुपये घेतले होते. रूमचे काम सुरू असून एक महिन्यांत रूमचा ताबा मिळेल असे सांगून त्यांनी तीन ते चार महिने उलटूनही रूमचा ताबा दिला नाही. त्यामुळे ही महिला चौकशीसाठी तिथे गेली होती. यावेळी तिला शेख कुटुंबीयांनी दुसऱ्या व्यक्तीला हेव्ही डिपॉझिटवर हा रूम दिल्याचे समजले. त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने या सर्वांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in