डिलिव्हरीच्या ११ लाखांच्या वस्तूंच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक

डिलिव्हरीच्या ११ लाखांच्या वस्तूंच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक

डिलिव्हरीच्या सुमारे ११ लाखांच्या वस्तूचा अपहार केल्याप्रकरणी सतीश मिठाईलाल राजभर या आरोपीला साकीनाका पोलिसांनी दीड वर्षांनी अटक केली.
Published on

मुंबई : डिलिव्हरीच्या सुमारे ११ लाखांच्या वस्तूचा अपहार केल्याप्रकरणी सतीश मिठाईलाल राजभर या आरोपीला साकीनाका पोलिसांनी दीड वर्षांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याच्यासोबत देवदयाल रामउजागीर चौरसिया आणि शिवशंकर जैस्वाल हे सहआरोपी असून ते तिघेही अंधेरीतील एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. ॲॅमेझॉन कंपनीचे ऑनलाईल पार्सल त्यांच्या कंपनीमार्फत डिलीव्हर केले जातात. जून २०२२ रोजी देवदयाल, सतीश आणि शिवशंकर यांनी डिलिव्हरीसाठी दिलेले पार्सल उघडून आतील सुमारे ११ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू काढून त्याचा अपहार केला होता. याबाबत काही तक्रारी प्राप्त होताच त्याची चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान या तिघांनी चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कंपनीचे टीम लीडर निलेश घाडगे यांनी साकीनाका पोलिसात तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in