स्टिल साहित्याच्या पैशांचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक

फसवणुकीचा हा प्रकार त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता.
स्टिल साहित्याच्या पैशांचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक

मुंबई- ऑर्डर केलेल्या स्टिल साहित्याचे पेमेंट करुनही स्टिल साहित्य न पाठविता एका खाजगी कंपनीची फसवणुक करणार्‍या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. टुनटुन शंकर शाह असे या आरोपीचे नराव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ५२ वर्षांचे तक्रारदार वांद्रे येथे राहत असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित असून कंपनीत तीन संचालक आहेत. कंपनीच्या बांधकाम साईटवर रॉक एन्क्रिंगच्या कामासाठी कस्टममाईज्ड स्टिलची गरज होती. त्यामुळे कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर महिलेने जस्ट डायल आणि इंडिया मार्टवर संबंधित स्टिल कंपनीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना एक मोबाईल क्रमांक मिळाला होता. या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर आरव जैन नाव सांगणार्‍या व्यक्तीने त्यांना स्ट्रिल साहित्य पुरविण्याचे आश्‍वासन दिले होते.

यावेळी त्याने मार्केट भावापेक्षा कमी किंमतीत चांगला माल देण्याचे आश्‍वासन देऊन तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. १४ ऑगस्टला तिने पुण्याच्या साईटवर तीस टन स्टिल साहित्य पाठविण्यास सांगितले होते. मालाची डिलीव्हरी करण्यापूर्वी त्यांच्याकडे पेमेंटची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तिने संबंधित खात्यात ६ लाख ५६ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत साईटवर स्टिल साहित्य पाठविले नाही. त्यामुळे तिने त्याला संपर्क साधला असता त्याने त्याच्या पत्नीसह मुलाचा अपघात झाला असून तो फॉलोअप घेऊ शकत नाही. तुम्ही बँक डिटेल्स पाठवा, त्यांचे पेमेंट त्यांना परत करतो असे सांगितले. त्यामुळे तिने त्याला कंपनीची बँक डिटेल्स पाठवून दिले होते. मात्र त्याने पेमेंट पाठवून दिले नाही. वारंवार संपर्क साधूनही तो तिला प्रतिसाद देत नव्हता.

फसवणुकीचा हा प्रकार त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच टुनटुन शाह याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानेच हा गुन्हा केल्याचे उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटक कारवाई केली होती.

logo
marathi.freepressjournal.in