Fraud : ४७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक

५० लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास त्यांना काही तासांत दहा लाख रुपयांचे व्याज मिळेल. त्यानंतर काही महिन्यानंतर त्यांना त्यांची गुंतवणुक केलेली ५० लाख रुपये परत केली जाईल
Fraud : ४७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक

गुंतवणुकीच्या नावाने एका व्यावसायिकासह चौघांची सुमारे ४७ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी सोनू ऊर्फ करण ओमप्रकाश रझारा या आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर पाचजणांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. यातील तक्रारदार कल्याण येथे राहत असून त्यांचा विविध मेडीकल स्टोरमध्ये औषध पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची एका मित्राकडून सुधीर देसाईशी ओळख झाली होती. त्याने त्याच्या इतर पाच सहकार्‍यांशी ओळख करुन त्यांना एक गुंतवणुक प्रपोजल दिला होता. त्यात त्यांनी कॅश स्वरुपात एकाच वेळेस ५० लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास त्यांना काही तासांत दहा लाख रुपयांचे व्याज मिळेल. त्यानंतर काही महिन्यानंतर त्यांना त्यांची गुंतवणुक केलेली ५० लाख रुपये परत केली जाईल असे सांगण्यात आले होते. ही योजना चांगली वाटल्याने त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in