मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपीचं २३ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव, बलात्काराच्या आरोपाखाली झाली होती अटक

Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर भागातील पेट्रोल पंपावर होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात एजन्सीचा मालक भावेश भिंडे याच्यावर २३ गुन्हे दाखल आहेत. त्याला नुकतीच बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपीचं २३ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव, बलात्काराच्या आरोपाखाली झाली होती अटक
Instagram
Published on

Mumbai-Ghatkopar Hoarding Owner Bhavesh Bhinde: मुंबईतील घाटकोपर भागातील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेला कथितरित्या जबाबदार असलेल्या जाहिरात एजन्सीचा मालक भावेश भिंडे, त्याच्यावर २३ गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्याला अलीकडेच बलात्काराच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली होती, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

सोमवारी (१३ मे) होर्डिंग दुर्घटनेसाठीही तो दोषी आहे. सध्या भावेश भिंडे फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध शहरातील पंतनगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३०४ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यात भिंडे याला जानेवारीत अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याला जामीन मिळाला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

पीटीआयच्या वृत्तानुसार, जानेवारीमध्ये भावेश भिंडेवरती मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती पण नंतर त्याला जामीन मिळाला होता,. एवढं नाही तर इगो मीडियाचा मालक भिंडे याने २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही लढवली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यानुसार, अनधिकृत होर्डिंग्ज लावण्याच्या असंख्य तक्रारींमुळे भावेश भिंडे यांच्या मालकीच्या कंपनीला भारतीय रेल्वेच्या एका विभागाने २०१७-१८ मध्ये ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते.

घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in