
मुंबई : मे महिन्यांत विलेपार्ले येथे झालेल्या कार अपघातात पल्लबी पाल भट्टाचार्य या २९ वर्षांच्या मैत्रिणीच्या मृत्यूस तर स्वत:सह भारती दिलप्रसाद राय आणि अंकित नरेश खरे यांना गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी कारचालक मित्र अध्शर्गू विजय बांदेकर याला मंगळवारी जुहू पोलिसांनी अटक केली. अपघातात तोदेखील जखमी झाला होता, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्यावर दोन महिन्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. हा अपघात १२ मे २०२३ रोजी पहाटे साडेतीन वाजता विलेपार्ले येथील व्ही. एम रोड, पेट्रोलपंपाजवळ झाला होता. अपघाताला अध्शर्गू बांदेकर हा जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध जुहू पोलिसंनी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत रुग्णालयातून डिस्चार्ज होताच त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.