उल्हासनगरमधील डिस्प्ले बोर्डवर पॉर्न व्हिडिओ प्रसारित केला जातो; चौकशी सुरू आहे
उल्हासनगरमधील डिस्प्ले बोर्डवर पॉर्न व्हिडिओ प्रसारित केला जातो; चौकशी सुरू आहेप्रातिनिधिक छायाचित्र

मैत्रिणीच्या हत्येप्रकरणी आरोपी मित्राला अटक

हेमकुमारीचा रविवारी वाढदिवस होता, वाढदिवस साजरा करण्यासाठी ती डंबरच्या घरी आली आणि तिचा हा शेवटचा वाढदिवस ठरला. डंबर आणि हेमकुमारी हे दोघेही नेपाळचे रहिवाशी आहे.

मुंबई : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणीची तिच्याच मित्राने मारहाण करून हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. हेमकुमारी मोतीराम भट असे या तरुणीचे नाव असून, तिच्या हत्येप्रकरणी डंबर बहादूर विश्वकर्मा याला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेमकुमारीचा रविवारी वाढदिवस होता, वाढदिवस साजरा करण्यासाठी ती डंबरच्या घरी आली आणि तिचा हा शेवटचा वाढदिवस ठरला. डंबर आणि हेमकुमारी हे दोघेही नेपाळचे रहिवाशी आहे. डंबर हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो, तर हेमकुमारी ही पेशंटची देखभाल करण्याचे काम करत होती. काही महिन्यांपूर्वीच ती नेपाळहून नोकरीसाठी मुंबईत आली होती. सहा महिन्यांपूर्वी तिची फेसबुकवरून त्याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यानंतर ते सोशल मीडियासह मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. रविवारी हेमकुमारीचा वाढदिवस होता. त्यामुळे तिने तिच्या मालकाची परवानगी घेऊन सुट्टी घेतली होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती डंबरच्या घरी आली होती. यावेळी त्याची आईही तिथे होती. या दोघांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर मद्यप्राशन केले होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यातून त्याने तिचे डोके भिंतीवर आदळले होते. त्यात ती बेशुद्ध झाली होती. तिला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in