पोक्सोच्या गुन्ह्यांतील आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा, अनैसर्गिक लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी

पोक्सोच्या गुन्ह्यातील एका आरोपीला दिंडोशीतील विशेष सेशन कोर्टाने १० वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पोक्सोच्या गुन्ह्यांतील आरोपीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा, अनैसर्गिक लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी

मुंबई : पोक्सोच्या गुन्ह्यातील एका आरोपीला दिंडोशीतील विशेष सेशन कोर्टाने १० वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दिलीप रामचंद्र सूर्यवंशी असे या ५१ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला अपहरणासह अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, मारहाण करणे तसेच अन्य कलमांतर्गत दोषी ठरवून ही शिक्षा सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांनी सांगितले.

चार वर्षांपूर्वी कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर या मुलाला मारहाण करून त्याच्यावर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर उघडकीस येताच, कुरार पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३६३, ३७७, ३४२, ३२३ भादंविसह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच दिलीप सूर्यवंशी या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याच्याविरुद्ध दिंडोशीतील विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सुरू होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली. यावेळी न्यायमूर्ती एस. एम टाकलीकर यांनी दिलीप सूर्यवंशी याला भादंविसह पोक्सोच्या प्रत्येक गुन्ह्यांत कोर्टात दोषी ठरवून त्याला वेगवेगळ्या कलमांतर्गत १० वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन काही दिवस कारावास भोगावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in