मानद परराष्ट्रीय वकिलातची बोगस नियुक्ती करणार्‍या आरोपीस अटक

सात लाख रुपये घेऊन सनमारिओ आणि भारत सरकारची फसवणुक केली
मानद परराष्ट्रीय वकिलातची बोगस नियुक्ती करणार्‍या आरोपीस अटक

मुंबई - मानद परराष्ट्रीय वकिलातची बोगस नियुक्ती करुन भारतातसह सनमारिनो देशाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका खाजगी जनसंपर्क कंपनीच्या अधिकार्‍याला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. अविनाश अरुणकुमार शर्मा असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. याच गुन्ह्यांत वस्तल ऋषीराज अग्रवाल या व्यावसायिकाला सहआरोपी दाखविण्यात आले आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात सनमारिनो देशात कुठल्याही मानद परराष्ट्रीय वकिलातची नियुक्ती केली नव्हती. तरीही सोशल मिडीयावर वस्तल अग्रवाल या भारतीय व्यावसायिकाची अशा प्रकारे नियुक्ती झाल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. हा प्रकार उपमुख्य राज्यशिष्टाचार अधिकारी अविनाशकुमार सिंग यांच्या निदर्शनाय येताच त्यांनी गृहविभागाला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर विशेष शाखेने तपास सुरु केला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी वत्सल अग्रवालला २८ फेब्रुवारी आणि २५ मार्च २०२२ रोजी चौकशीसाठी समन्स बजाविले होते. त्याने त्याच्या जबानीत तो अंधेरीतील वर्सोवा, म्हाडा तसेच आझादनगरातील शिवपार्वती सोसायटीचा रहिवाशी असल्याचे सांगितले होते. तो एका नोंदणीकृत खाजगी कंपनीत संचालक म्हणून कामाला होता. ही कंपनीत कोळसा उद्योगाशी संबधित असून भारतातील इतर छोट्या उद्योगांना ही कंपनीत कोळसा पुरविण्याचे काम करत होती. त्याने पर्यटन आणि व्यवसायानिमित्त विविध देशांना भेटी दिल्या होत्या. २०१३ ते २०१५ या कालावधीत तो इटलीच्या रोममध्ये गेला होता. यावेळी त्याची अविनाश शर्माशी ओळख झाली होती. शर्मा हा गोरेगाव येथील एम. जी रोड, रामबाग इमारतचा रहिवाशी असून त्याच्या मालकीची एक डिझीटली युवर्झ नावाची जाहिरात एजंसी आहे. तो व त्याची टिम वत्सल अग्रवाल याच्या कंपनीसाठी २०१७ पासून जनसंपर्क म्हणून काम करत होता. शर्माच्या कंपनीने मालाड येथे एक कार्यालय सुरु होते. यावेळी वत्सलसह त्यांचे वडिल ऋषीराज अग्रवाल यांना कोणत्याही देशाचे भारतातील मानद परराष्ट्रीय वकिलात पद प्राप्त करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते. अशा प्रकारे पद देताना परराष्ट्र मंत्रालयातून खात्री करणे आवश्यक होते, मात्र वत्सल अग्रवालने अशी कोणतीही शहानिशा केली नव्हती. या पदासाठी अविनाश शर्माने त्यांच्यासह त्यांच्या वडिलांसाठी प्रत्येकी दहा लाखांप्रमाणे वीस लाख देण्यास सांगितले होते. त्यापैकी दोन लाख रुपये त्याच्याकडून घेतले होते. १० डिसेंबर २०२१ रोजी वत्सल अग्रवाल यांची सनमारिनो या देशाचे भारतातील मानद परराष्ट्रीय वकिलात म्हणून नियुक्ती झाल्याचे कागदपत्रे दिले होते. त्यासाठी अविनाश शर्माने रिपब्लिक डी सन मारिनोच्या दूतावास कार्यालयातील मोरिझो बॅटीसटिनी यांचे बोगस लेटर हेड आणि खोटे पत्र तयार केले होते. या पदानंतर त्यांच सनमारिनो येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल असे सांगून त्यांची सोशल मिडीयावर तशी प्रसिद्ध दिली होती. इतकेच नव्हे तर परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर त्यांची सनमारिओच्या मानद परराष्ट्रीय वकिलात म्हणून नियुक्ती झाल्याची नोंद करण्याची विनंती केली होती. या कामाचा मोबदला म्हणून त्याने वत्सलकडून पाच लाख रुपये घेतले होते. वत्सल यांनी या पत्राची कुठलीही शहानिशा केली नव्हती. मूळात सनमारिनो या देशात भातातील मानद परराष्ट्रीय वकिलात हे पद अस्तिवात नसून तसा प्रस्तावही परराष्ट्र मंत्रालयाकडे आला नव्हता. असे असताना अविनाश शर्माने वत्सल अग्रवाल यांची नियुकती झाल्याची माहिती न्यूज वेब पार्टल तसेच त्याच्या ऍम्बेसी पेजवरुन अपलोड करुन लोकांची दिशाभूल करुन स्वतच्या प्रसिद्धीसाठी आणि फसवणुक केली होती. पैशांसाठी अविनाश शर्मा याने ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. या कामासाठी त्याने त्याच्याकडून सात लाख रुपये घेऊन सनमारिओ आणि भारत सरकारची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच जून २०२२ रोजी अविनाश शर्मा आणि वत्सल अग्रवाल यांच्याविरुद्ध बांगुरनगर पोलीस ठाण्यात बोगस दस्तावेज सादर करुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत एक वर्षांनंतर अविनाश शर्माला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने वैयक्तिक फायद्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in