धावत्या लोकलमध्ये ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप ; रेल्वे अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु

एका व्यक्तीने हा व्हिडिओ शुट करुन ट्विटरवर पोस्ट केला आहे.
धावत्या लोकलमध्ये ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप ; रेल्वे अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अनेक घटना घडत असतात. मुंबई लोकमधील अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. आता असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ शुट करुन ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चालू लोकलमध्येच ड्रग्जचे सेवन करताना दिसत आहे.

शुक्रवार (१ सप्टेंबर) रोजीची ही घटना असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्विटर हँडल वापरणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्याने पोस्ट शेअर करत मुंबई पोलिसांना(Mumbai Police) टॅग केलं आहे. यामुळे सार्वजनिक वाहतून व्यवस्थेतील प्रवाशंच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

हा व्हिडिओ फक्त चार सेकंदाचा असून यात एक व्यक्की ड्रग्जचं सेवन करताना दिसत आहे. तर त्याच्या सोबतचा त्याला त्या कामात मदत करत आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे की, "@Mumbai_police_लोकल ट्रेनमध्ये ड्रग्ज घेतलं जात

आहे. लोकांच्या खिशात अनेक ड्रग्ज आहेत. आणि त्यांच्याकडे ६ लहान मुले आणि १ मुलगी देखील आहरे. ते सर्व नालासोपारा स्टेशनमध्ये आतरले आहेत. दिनांक 1/09/2023 वेळ 1:25 AM रात्री."

रेल्वे अधिकाऱ्यांनी या ट्विटला तात्काळ प्रतिसाद देत चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबई सेंट्रल विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना टॅग केले, आवश्यक कारवआईसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवले. विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश रेल्वे संरक्षण दलाला दिल्याने पुढील कारवाई वेगाने सुरु करण्यात आली आहे. या इसमाची ओळख पटवून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी या प्रकरणाचा सक्रिया पाठपूरावा करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in