ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक

ऑक्टोबर महिन्यांत तिला एका अज्ञात व्यक्ती घरबसल्या चांगल्या कमिशनवर जॉब देण्याची ऑफर दिली होती
ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक
Published on

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. दिनेश लच्छीराम यादव असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासह त्याच्या इतर सहा सहकाऱ्यांवर एका शिक्षिकेची सुमारे साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांतील फरार असलेल्या आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत. बोरिवली येथे राहणारी तक्रारदार महिला शिक्षिका आहे. ऑक्टोबर महिन्यांत तिला एका अज्ञात व्यक्ती घरबसल्या चांगल्या कमिशनवर जॉब देण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर ऐकल्यांनतर तिने त्यास होकार दिला होता. त्यानंतर तिला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करुन तिथे तिला प्रोडक्ट लाईक करण्याचे टास्क देण्यात आले होते. सुरुवातीला या टास्कवर चांगले कमिशन मिळत होते. मात्र नंतर प्रत्येक टास्कसाठी तिला काही रक्कम गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. जास्त कमिशनच्या नादात तिने विविध प्रिपेड टास्कसाठी ७ लाख ५२ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in