अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षे शिक्षा

पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर घरात कर्ता पुरुष नसल्याचा गैरफायदा घेत, आरोपी सिद्धेशने जुलै ते ऑगस्ट २०१७ मध्ये पीडितेवर वारंवार जबरदस्तीने अत्याचार केले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षे शिक्षा
Published on

मुंबई : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायाधीश एस. सी. जाधव यांनी आरोपी सिद्धेश गडकरी याला १० वर्षांच्या सश्रम कारावासासह १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर घरात कर्ता पुरुष नसल्याचा गैरफायदा घेत, आरोपी सिद्धेशने जुलै ते ऑगस्ट २०१७ मध्ये पीडितेवर वारंवार जबरदस्तीने अत्याचार केले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. अखेर पीडितेच्या आईने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सिद्धेशला अटक केली.

चार महिन्यात जामीनावर सुटलेल्या सिद्धेशच्या खटल्याची न्यायाधीश एस. सी. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील ॲॅड. वीणा शेलार यांनी सबळ पुराव्यांसह अनेक साक्षीदार तपासून सिद्धेशचे दोषत्व सिद्ध केले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने सिद्धेशला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

logo
marathi.freepressjournal.in