अभिनेता पुष्कर जोगवर कारवाई करा; तीव्र आंदोलनाचा इशारा

जोग यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल युनियनने राज्य मागासवर्ग आयोग व पालिका आयुक्तांकडे केली आहे. जोग यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रमाकांत बने यांनी दिला आहे.
अभिनेता पुष्कर जोगवर कारवाई करा; तीव्र आंदोलनाचा इशारा
Published on

मुंबई : मराठी सिने अभिनेता पुष्कर जोगने मराठा सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जात विचारली म्हणून सोशल मीडियावर अपमानास्पद विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पालिकेतील कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांचे हे विधान सरकारी कर्मचाऱ्यांचा अपमान करणारे असल्याने जोग यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल युनियनने राज्य मागासवर्ग आयोग व पालिका आयुक्तांकडे केली आहे. जोग यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात २३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू आहे. पालिका कर्मचारी हा सर्व्हे घरोघरी जाऊन करत आहेत. मागासवर्ग आयोगाने दिलेल्या ॲपनुसार कर्मचाऱ्यांकडून माहिती विचारली जात आहे. सर्वेक्षणासाठी गेलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने अभिनेता पुष्कर जोग यांनी ‘एक्स’ या माध्यमावर पोस्ट टाकत त्या महिला कर्मचाऱ्याला अपमानस्पद विधान केल्याने कामगार संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियन व दी म्युनिसिपल युनियन या संघटनांनी तीव्र निषेध करीत जोग यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य मागासवर्ग आयोग व पालिका आयुक्त यांच्याकडे केली असल्याची माहिती यूनियनने दिली.

logo
marathi.freepressjournal.in