नो हॉकिंग डे मोहीमेअंतर्गत २११६ वाहनचालकावर कारवाई

नो हॉकिंग डे मोहीमेअंतर्गत २११६ वाहनचालकावर कारवाई

वातावरणातील ध्वनी प्रदुषणाची तीव्रता कमी करण्यासाठी आगामी दिवसांत अशाच प्रकारे नो हॉकिंग डे मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले

मुंबई : नो हॉकिंग डे मोहीमेतर्ंगत वाहतूक पोलिसांनी बुधवारी दिवसभरात २ हजार ११६ वाहनचालकाविरुद्ध कारवाई केली. वातावरणातील ध्वनी प्रदुषणाची तीव्रता कमी करण्यासाठी आगामी दिवसांत अशाच प्रकारे नो हॉकिंग डे मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बुधवारी १४ जूनला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबई शहरात ध्वनीप्रदुषण आणि वाहन चालकांमधील विनाकारण हॉर्न वाजविण्याची प्रवृत्ती कमी करण्यासाठी नो हॉकिंग डे मोहीमचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत मिडीयासह एफएम रेडिओ, वर्तमानपत्र, डिजीटल होर्डिंग्स आणि ट्विटर संदेशाद्वारे जनजागृती करण्यात आली होती. काही सामाजिक संस्था, शाळा आणि समाजसेवकांनी मुंबई पोलिसांच्या या मोहीमेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता. त्यांच्या मदतीने वाहतूक पोलिसांन चौकाचौकात नो हॉकिंग डेच्या संदेशाचे फलक प्रदर्शित केले होते.

दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांकडून विविध गर्दीच्या चौकांमध्ये आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाज करण्यात आले. त्यात काही वाहनचालकाकडून पोलिसांना सकात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे बुधवारी रस्त्यावरील हॉर्नच्या आवाजाची तीव्रता कमी प्रमाणात झाल्याचे आढळून आले होते. मात्र काही वाहन चालकांनी विनाकारण हॉर्न वाजविण्याची प्रकृती कायम ठेवल्याचे दिसून आले. अशा २ हजार ११६ वाहनचालकाविरुद्ध पोलिसंनी कारवाई केली होती. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १९४ एफ नुसार ई-चलन कारवाई करण्यात आली होती. ही मोहीम आगामी काळात अशाच प्रकारे राबविण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिल्याबाबत वरिष्ठांनी मुंबईकरांचे आभार व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in