मुंबई : मुंबईतील बेकायदा फेरीवाले पालिकेच्या रडारवर आले असून बेकायदा फेरीवाल्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जानेवारी २०३४ ते जानेवारी २०२४ पर्यंत तब्बल १ लाख ८९ हजार ३०० बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बेकायदा फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईतून तब्बल दोन कोटी ८३ लाख ६७ हजार ५३ रुपये दंड वसूल केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत मोकळी जागा मिळेल तिकडे बेकायदा फेरीवाले आपले बस्तान मांडत आहेत. बेकायदा फेरीवाल्यांनी पदपथ रस्त्यांवर कब्जा केला आहे. बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करत पदपथ रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईतील बेकायदा फेरीवाले पालिकेच्या रडारवर आले आहेत. रस्ते, पदपथावर अतिक्रमण केलेल्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरही बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापले असून पदपथ रस्ते, रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात.
अशी झाली वर्षभरात कारवाई
महिना बेकायदा फेरीवाले दंड वसूल
जानेवारी १२,७६१ १५,८३,३११
फेब्रुवारी १६,१२८ २१,४९,८३०
मार्च १६,११७ २४,१०,७३६
एप्रिल १३,४२३ १७,३७,०७९
मे १७,८०६ २५,४७,६५८
जून १८,१०९ २३,४१,९३५
जुलै १४,००३ १९,४६,६६८
ऑगस्ट १५,२६२ २३,८६,५७२
सप्टेंबर ११,९५४ १७,१५,९७२
ऑक्टोबर १५,१०२ २५,०६५,१७
नोव्हेंबर १२,८४७ २१,८३,२८०
डिसेंबर १३,६९२ २४,९१,६४३
जानेवारी-२४ १२,०९६ २३,६५,८५२