पराभवाच्या भीतीनेच नॅशनल हेराल्डवर कारवाई नाना पटोले यांचा आरोप

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पराभवाच्या भीतीनेच नॅशनल हेराल्डवर कारवाई
नाना पटोले यांचा आरोप

मुंबई : राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर ईडीची कारवाई केली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. पण, काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ मधील कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या वृत्तपत्राची मालकी असणाऱ्या यंग इंडियन कंपनीच्या ७५१.९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली. नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक आहेत. यापूर्वीही ती जाहीर केलेली आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने नॅशनल हेराल्डवर कारवाई करत आहे. पण, अद्याप त्यांच्या हाती काहीच लागले नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पराभव दिसू लागताच मोदी सरकार ईडीचा दुरुपयोग करून अशा प्रकारच्या कारवाया करून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत असते, असा आरोप पटोले यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in