विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचे आदेश

दुचाकीस्वार आणि विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यां कठोर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.
विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचे आदेश
एएनआय
Published on

मुंबई : दुचाकीस्वार आणि विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यां कठोर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.

रस्ते अपघातात मृत्यूच्या वाढत्या संख्येला विना हेल्मेट वाहन चालविणारे जबाबदार असून मोटार वाहन कायद्यांतर्गत हेल्मेट नसलेल्या दुचाकी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सुनिश्चित करण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वी हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना तसेच संरक्षणात्मक उपाययोजना न करता दुचाकीवर चालकाच्या मागे बसलेल्यांना दंड आकारण्यात आला होता.

कारवाईमुळे हेल्मेटशिवाय मोटारसायकल वापरणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या संख्येला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in