भेसळयुक्त मावाप्रकरणी २७६ दुकानांवर कारवाई, ७२४ दुकानांची झाडाझडती

या तपासणीत ६३ किलो मिठाई व ९ किलो भेसळयुक्त मावा नष्ट करण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले
भेसळयुक्त मावाप्रकरणी २७६ दुकानांवर कारवाई, ७२४ दुकानांची झाडाझडती

मुंबई : सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मावा मिठाई विक्री करणे दुकानदारांना चांगलेच महागात पडले. पालिकेच्या आरोग्य विभागाने ७२४ दुकानांची झाडाझडती घेतली. या छापेमारीत तब्बल २७६ दुकानांत भेसळयुक्त मावा, मिठाई विक्री होत असल्याचे तपासणीत आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. या तपासणीत ६३ किलो मिठाई व ९ किलो भेसळयुक्त मावा नष्ट करण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. विना परवाना व परवानाधारक आदींवर कारवाई करण्यात आली.

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मावा, मिठाई विक्री होते. मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये, यासाठी मावा, मिठाई विक्री करणाऱ्या दुकानांची झाडाझडती घेण्यात आली. मावाची २७, शीतगृह २ व मिठाईची ६९५ अशा एकूण ७२४ दुकानांची तपासणी करण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांनी मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांनी कसून तपासणी केली. यात भेसळयुक्त मावा मिठाई आढळून आल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ही कारवाई डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी केली कारवाई

दुकान पाहणी लायसन्सधारक विना परवाना

मावा २७ २ ११

शीतगृहे २ २ १

मिठाई ६९५ १७१ ८९

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in