वडाच्या झाडाची फांदी कापणाऱ्यांवर कारवाई होणार

वडाच्या झाडाची फांदी कापणाऱ्यांवर कारवाई होणार

वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर वडाच्या झाडाच्या फांद्या, अथवा झाड तोडू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

येत्या १४ जून रोजी वटपौर्णिमा असून, या दिवशी वडाच्या झाडाची फांदी कापणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्र लिहून आयुक्तांकडे केली होती. भाजपच्या मागणीनंतर पालिका प्रशासनाने आता अनधिकृत वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई किंवा कारावासची शिक्षा होईल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, येत्या वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर वडाच्या झाडाच्या फांद्या, अथवा झाड तोडू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अनधिकृत वृक्षतोड केल्याचे आढळल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम कलम २१ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात येत आहे.

वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास किंवा तोडण्यास कारणीभूत होणे हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यास प्रत्येक अपराधाकरिता कमीत कमी रुपये एक हजारपासून रुपये पाच हजारांपर्यंत दंड आकारण्यात येतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in