मनी लाँड्रिंगप्रकरणी नवाब मलिक यांचा सक्रिय सहभाग; ईडी करून जामीन अर्जाला विरोध

कारागृहाबाहेर राहण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नसल्याने त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली
 मनी लाँड्रिंगप्रकरणी नवाब मलिक यांचा सक्रिय सहभाग; ईडी करून जामीन अर्जाला विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्रिय सहभाग असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) करून मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. तसेच सहा आठवड्यांपेक्षाही अधिक काळ वैद्यकीय कारणास्तव मलिक कारागृहाबाहेर होते. आता मात्र त्यांचे कारागृहाबाहेर राहण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नसल्याने त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे.

ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले. त्यानुसार ईडीने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. याआधीही मलिक यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आता मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांनी याचिकेत केला आहे.

या याचिकेची दखल घेत न्यायालयाने मागील सुनावणीच्यावेळी तपास यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार विशेष सत्र न्यायालयाने ईडीला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ईडीने प्रतिज्ञापत्र सादर करून जामीन अर्जाला विरोध केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in